पार्किंगमध्ये असलेली वाहन जळून खाक

September 28, 2011 7:47 AM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

पुणे-बंगलोर हायवेवरील नरेगाव इथे मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास कृष्णकुंज इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या पाच बाईक जळुन खाक झाल्या आहेत. तर दोन बाईक अर्धवट जळल्या आहेत. पेट्रोल चोरीच्या प्रकारातून आग लागल्याचा रहिवाशांचा संशय आहे. अचानक लागलेल्या आगीमुळे नागरीकांमध्ये खळबळ उडलेली आहे. काही महिन्यापुर्वी नाशिक आणि औरंगाबादमध्येही अश्याच प्रकारच्या घटना घडल्या होत्यात. मात्र ही आग का लावण्यात आली हे अजूनही उघडतीस झाले नाही.

close