सचिनचा स्वप्नातल्या महालात गृहप्रवेश

September 28, 2011 11:56 AM0 commentsViews: 80

28 सप्टेंबर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आज त्याच्या नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. बांद्र्यात पेरी क्रॉस रोडवर सचिनचं हे नवं पाच मजली घर आहे. सचिन आज त्याची पत्नी अंजली तेंडुलकर आणि आई रजनी तेंडुलकर तसेच काका-काकूंसह या घरात आला. पण पूजा इंग्लंड दौर्‍यासाठी निघण्यापूर्वीच झाली होती असं सचिनने आज स्वत:च स्पष्ट केलं. आणि घरातीलं नुतनीकरणाचे काम अजून संपलेलं नाही.

त्यामुळे दिवळीच्या सुमारास तेंडुलकर कुटुंबीय या घरात रहायला जातील. सचिनचं हे घर खास त्याच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन बांधण्यात आलं आहेत. बेसमेंटमध्ये 40 ते 50 गाड्या पार्क करता येतील इतकं मोठं पार्किंग आहे. शिवाय बेसमेंटमध्येच किचन आणि सर्व्हंट क्वार्ट्स असतील. तर तळ मजल्यावर मोठा दिवाणखाना तसेच गणेशाचं एक मंदिरही असणार आहे.

शिवाय सचिनने आतापर्यंत जिंकलेल्या ट्रॉफी मांडण्यासाठी दिवाणखान्यात खास जागा करण्यात आली. युफओ मुव्हीज कंपनीने कुठलीही नवी फिल्म सचिनला घरीच आणि अगदी फर्स्ट डे फर्स्ट शो बघता यावी यासाठी त्याच्या घरी मिनी थिएटर उभारलंय. हे थिएटरही तळ मजल्यावर असणार आहे. वरचे दोन मजले सचिन आणि त्याच्या कुंटुंबीयांसाठी असतील आणि यात स्विमिंग पूल आणि जिम्नॅशिअमही आहे.

close