महालक्ष्मीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात

September 28, 2011 8:08 AM0 commentsViews: 6

28 सप्टेंबर

साडेतीन शक्तीपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. सकाळी घटस्थापना करण्यात आली. त्यानंतर सरकारी पुजा आणि आभिषेक असे धार्मिक विधी पार पडले. आज दुपारी दोन वाजता देवीची सालंकृत बैठी पूजा मांडण्यात येणार आहे. मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. भक्तांना सुलभ दर्शन व्हावं त्यासाठी नियोजन करण्यात आलंय. नवरात्रोत्सवाच्या काळात दहा ते बारा लाख भक्त देवीच्या दर्शनाला येतील अशी शक्यता आहे.

close