रोजगाराच्या संधी वाढणार

November 17, 2008 8:14 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबरइन्फ्रास्ट्रक्चर कंपनी लार्सन अँड टूब्रोनंही येत्या तीन वर्षात दहा हजार नोकर्‍या देण्याची घोषणा केली आहे. कंपनी गुजरातमध्ये बाराहून अधिक नवे प्लान्ट सुरू करतेय. यातला एक भारत सरकारशी संयुक्त असा प्रकल्प असेल आणि दोन प्रकल्पांसाठी कंपनीनं एका जपानी कंपनीशी करार केलाय. एल अँड टी चेन्नई आणि कोईम्बतूरमध्येही प्लान्ट उभारणार आहे. मंदीचा थेट परिणाम होत नसला तरीही क्लाएंट्सशी होणार्‍या सौद्यांवर याचा परिणाम दिसत असल्याचं कंपनीनं मान्य केलंय. अमेरिकन विमा कंपनी मेटलाईफ देखील भारतातल्या शाखांसाठी येत्या पाच महिन्यात अंदाजे बत्तीस हजार जणांची नवी भरती करणार आहे. मेटलाईफ इंडिया त्यांच्या शाखांची संख्याही वाढवणारेय. या बत्तीस हजार नोकर्‍यांमध्ये तीस हजार पदं सेल्स एंजट्ससाठी आणि दोन हजार पदं सेल्स मॅनेजरसाठी असतील.

close