अमरावतीत तरुणीला 15 हजार रुपयांना विकले

September 28, 2011 12:42 PM0 commentsViews: 3

28 सप्टेंबर

पश्चिम बंगालमधील 20 वर्षीय तरूणीला अमरावतीत 15 हजार रुपयामध्ये विकण्याची धक्कादायक घटना उजेडात आली. अमरावतीत साईनगर भागातील एका फ्लॅटमध्ये या तरुणीला डांबून ठेवण्यात आलं होतं. या मुलीनं काल तिसर्‍या मजल्यावरुन साडी आणि चादरीच्या साह्याने पळ काढला. 2 दिवसांपुर्वी साईनगर भागातील संजीवनी अपार्टंमेटमध्ये नेहा खैरकर आणि अमित मत्तानी यांच्या घरी या तरुणीला तिच्या नवर्‍यानं आणून ठेवलं होतं. या अपार्टंमेटमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. या युवतीचा पाठलाग करुन तिला परत आणण्याचा नेहा आणि अमितचा प्रयत्न फसला. सध्या बडनेरा पोलिसांनी या युवतीला आपल्या ताब्यात घेतलं असून तिच्या घरी पोहोचवून देण्यात आल्याचं म्हटलंय.

close