पश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून भीषण पेट

September 28, 2011 2:06 PM0 commentsViews: 1

28 सप्टेंबर

पश्चिम बंगालमध्ये मालगाडी घसरून तिने पेट घेतला. पश्चिम बंगालच्या आलूवाडी आणि मांगूरजान रेल्वे स्टेशनांदरम्यान मालगाडीवरचे 5 टँकर्स अचानक पेटले. घर्षणामुळे आग लागली. आणि बघता बघता 5 पेट्रोल टँकर्स असे पेटले. आगीचे स्वरूप एवढं भीषण होतं, की रेल्वेचा एक रुळही पूर्ण तापून भट्टीतल्या पोलादासारखी लाल भडक झाला होता. तसेच जवळच्या साठलेल्या पाण्यात पेट्रोल पडलं. त्यामुळे या तलावातही आग लागल्याचे दृश्य होतं. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. पण अजूनही कोणताही अधिकारी घटनास्थळावर पोहोचला नव्हता. फायर ब्रिगेडचे जवानही पोहोचलेले नाहीत. आग अजूनही भडकत आहे.

close