गोवा खाण घोटाळा : कागदोपत्रीच कंपन्याचे अस्तित्वात !

September 28, 2011 2:16 PM0 commentsViews: 11

28 सप्टेंबर

गोवा खाण घोटाळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कागदोपत्री अस्तित्वात असलेल्या अनेक कंपन्यांचा प्रत्यक्षात ठावठिकाणाच नाही. शहा आयोगाच्या निर्देशावरुन गोव्याच्या मुख्य सचिवांनी गोव्यातून खनिज निर्यात करणार्‍या कंपन्यांची माहिती मिळवायला सुरुवात केली. पोलिसांकडे एकूण 405 कंपन्यांची यादी आली आहे. पण पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा यापैकी अनेक कंपन्यांचा ठावठिकाणाच नसल्याचं पुढे आलंय. गोव्याचे काँग्रेस प्रभारी जगमित ब्रार हेसुद्धा गोव्यात दाखल झाले आहेत. ते काँग्रेस मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनीही गोव्यातला खाण घोटाळा हा देशातला सर्वात मोठा घोटाळा असल्याचं म्हटलंय.

close