अण्णा लिहिणार आता ब्लॉग !

September 28, 2011 3:31 PM0 commentsViews: 1

28 सप्टेंबर

विविध विषयांवर अण्णा हजारे आता ब्लॉगच्या माध्यमातून आपले विचार मांडणार आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून अण्णा आता लोकांच्या भेटीला येणार आहेत. http://annahazaresays.wordpress.com आणि http://annahazaresays.blogspot.com, विजय कुवळेकर आणि राजू परूळेकर हा ब्लॉग प्रसिद्ध करणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजीसह आवश्यक त्या भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये हा मजकूर असणार आहे.

अण्णांचं पत्र''विविध विषयांवरील माझे म्हणणे नेमके काय आहे,अशी विचारणा मला जगभरातून केली जाते. तसेच इतरांच्या विधानांमुळेही अनेकदा याबाबतची परिस्थिती स्पष्ट होतेच अस नाही. म्हणूनच अधिकृतपणे माझे विचार व विविध विषयांवरील माझे म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून ब्लॉगची निर्मिती करत आहे. मराठी, हिंदी, इंग्रजीसह आवश्यक त्या भारतीय आणि जागतिक भाषांमध्ये हा मजकूर प्रसिध्द केला जाईल. या ब्लॉगवर प्रसिध्द केले जाणारे सर्व विचार ही माझी अधिकृत भूमिका असेल म्हणूनच माझ्या संमतीशिवाय या ब्लॉगवर काहीही प्रसिध्द केले जाणार नाही.- अण्णा हजारे

close