प्रणवदांचे पंतप्रधान कार्यालयाकडे बोट !

September 28, 2011 4:28 PM0 commentsViews: 6

28 सप्टेंबर

2 जी बाबत आपल्या वादग्रस्त नोटवरून बराच गदारोळ झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी आज आपली बाजू सोनिया गांधी आणि पंतप्रधानांकडे पत्र पाठवून मांडली. या नोटची पंतप्रधान कार्यालयाला याची पूर्ण कल्पना होती असा दावा करत त्यांनी या वादासाठी एकटे जबाबदार नसल्याचं सुचवलं. दुसरीकडे सुप्रीम कोर्टात उद्या पुन्हा चिदंबरम यांच्याबद्दलची सुनावणी सुरु राहणार आहे. दरम्यान, काँग्रेसने मात्र चिदंबरम दोषी नसल्याचं स्पष्ट केलं.

2 जी घोटाळ्यावरून केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखजीर्ंनी पंतप्रधानांना लिहिलेल्या नोटवरून वातावरण बरंच तापलंय. त्यामुळे अखेर प्रणव मुखजीर्ंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंगांना पत्र लिहून वादग्रस्त नोट कशी तयार करण्यात आली याचं स्पष्टीकरण दिलं. तसेच प्रणवदादांनी या वादग्रस्त नोटसाठी आपण एकटेच जबाबदार नसल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला.

- नोटसाठीचा मजकूर पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवांकडूनच मिळाला होता- पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारीला राज्यसभेत 2 जी प्रकरणी निवेदन केलं होतं.- त्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाचा घटनाक्रमक आणि त्याच्याशी संबंधित मेलवर एक सर्वसमावेशक नोट तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला- यासाठी झालेल्या बैठकीला अर्थ, दूरसंचार, कायदा मंत्रालयांचे सचिव आणि पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव उपस्थित होते. – या बैठकीनंतर अर्थमंत्रालयानं 12 उतार्‍यांची नोट तयार केली- ही नोट कॅबिनेट सेक्रेटरीने आणखी 14 उतारे घालून परत पाठवली- ही नोट अर्थमंत्र्यांना दाखवण्यात आली

प्रणव मुखर्जी बुधवारी याबाबत पंतप्रधानांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे 2 जी घोटाळ्याप्रकरणी पी. चिदंबरम यांची चौकशी करायची की नाही, यावरची सुनावणी सुप्रीम कोर्टात बुधवारी पुन्हा होणार आहे. याचिकाकर्त्यांच्या बाजूने ऍडव्होकेट प्रशांत भूषण यांनी सीबीआयचा तपास प्रामाणिकपणे सुरू नसल्याचा आरोप केला. पण चिदंबरम यांची जोरदार पाठराखण काँग्रेसने केली.

काँग्रेस आणि भाजप चिदंबरम यांच्या पाठिशी ठाम राहिले असले तरी, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

प्रणव मुखजीर्ंचं स्पष्टीकरण

- नोटसाठीचा मजकूर पंतप्रधान कार्यालय, कॅबिनेट सचिवांकडूनच मिळाला होता- पंतप्रधानांनी 24 फेब्रुवारीला राज्यसभेत 2 जी प्रकरणी निवेदन केलं – त्यानंतर स्पेक्ट्रम वाटपाचा घटनाक्रमक आणि त्यासंबंधातल्या मेलवर नोट तयार करण्याचा निर्णय सरकारनं घेतला- यासाठीच्या बैठकीला अर्थ, दूरसंचार, कायदा मंत्रालयांचे सचिव, पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव उपस्थित होते- या बैठकीनंतर अर्थमंत्रालयानं 12 उतार्‍यांची नोट तयार केली- ही नोट कॅबिनेट सेक्रेटरीनं आणखी 14 उतारे घालून परत पाठवली- ही नोट अर्थमंत्र्यांना दाखवण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. सीबीआयचे रुपांतर स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीममध्ये करावे अशी मागणी त्यांनी केली. निवृत्त न्यायाधीश आणि निवृत्त पोलीस अधिकार्‍याची या टीमवर निगराणी असावी, असं प्रशांत भूषणं यांनी कोर्टाला सूचवले.

close