भगर खाल्याने 100 जणांना विषबाधा

September 29, 2011 4:03 PM0 commentsViews: 8

29 सप्टेंबर

नवरात्रीच्या उपवासामध्ये भगर खाल्याने पुणे, सोलापूर,कोल्हापूर, बारामती या ठिकाणी सुमारे 100 जणांना विषबाधा झाली. याप्रकरणी अन्न आणि औषधी प्रशासनाने आज नाशिकमधल्या अशोक सकाला भगर मिलमधल्या वरई तांदूळाचे नमुने घेतले. अंंबड एमआयडीसीमधल्या आनंद भगर मिल मधून हे नमुने गोळा करण्यात आले आहेत. काल मध्यरात्रापासून भगरीमुळे विषबाधा होणार्‍यांची संख्या वाढलीय. एकट्या सोलापूरमध्ये 50 जणांना विषबाधा झाली.

सोलापूरमध्ये पन्नास जणांना विषबाधा झाली आहे. काल मध्यरात्रीपासून भगरीमधून विषबाधा झालेल्यांची संख्या वाढत चालली आहे. विषबाधा झालेल्यांना सोलापूरच्या शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर नाशिकच्या एमआयडीसीच्या आनंद भगर मिलवर छापा टाकून तिथल्या भगरीचे नमुने घेण्यात आले आहेत.

पुण्याच्या अन्न व औषध प्रशासनाने हा छापा टाकला आहे. पुण्यात आणि कोल्हापूरमध्येही काल भगरीच्या पिठातून विषबाधा झाली होती. पुणे आणि कोल्हापूर इथं झालेल्या विषबाधेच्या पार्श्वभूमीवर आज नाशिकमधल्या भगर मील मधल्या भगरीचे नमुने घेतले. आले. कोल्हापूर आणि पुण्यात लोकांना विषबाधा झाली होती.

तर बारामतीमध्ये वरईची भाकरी खाल्यामुळे विषबाधा झालीय. मोरगाव आणि मुरटीमध्ये विषबाधा झालेल्यांची संख्या 47 वर गेली. पुण्यात पौड रोडवरच्या जय भवानीनगरमध्ये 25 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं.

close