तुळजाभवानीचं दर्शन आता ऑनलाईन

September 29, 2011 11:56 AM0 commentsViews: 80

29 सप्टेंबर

नवरात्रोत्सवाची धूम सगळीकडे सुरू आहे. आता तुळजापूरच्या तुळजाभवानीचं भक्तांना ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. www.tuljabhavanimandir.org या वेबसाईटवर आता देवीचं दर्शन घडू शकतं. त्यामुळे या नवरात्रोत्सवात ज्यांना तुळजापूरला जाऊन मातेचं दर्शन घेता येणार नाही त्यांना आता देवीचं ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. दरम्यान, कालपासून तुळजाभवनीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची सुरूवात झालीय.देवीची नित्योपचार पूजा करून घटस्थापना करण्यात आली. त्याआधी गोमुख तीर्थ, कल्लोळ तीर्थ कळसात घेऊन कळसाची मंदिरातून मिरवणूक काढत देवीच्या गाभा-यात ही घटस्थापना करण्यात आली.

close