डोंबिवलीत 79 बांग्लादेशींवर गुन्हे दाखल

September 29, 2011 12:05 PM0 commentsViews: 1

29 सप्टेंबर

भारतात वास्तव्याचा अधिकृत परवाना नसतांनादेखील इथं वास्तव्य करणार्‍या एकूण 79 नागरिकांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने डोंबिवलीतून अटक केली. हे सर्व बांग्लादेशचे नागरिक आहेत. आज दुपारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. अटक केलेल्या नागरिकांमध्ये 41 महिला आणि 27 पुरूष यांच्यासह 10 लहान मुलांचा समावेश आहे. ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं डोंबिवलीतील मानपाडा गाव आणि सोनारपाडा इथून अनाधिकृतपणे वास्तव्य करून राहत असल्यामुळे याच्यावर भारतीय पारपत्र अधिनियम कलम 3(अ),6(अ) प्रमाणं कारवाई करण्यात आली.

close