इंग्लंड सीरिजला सचिन, सेहवागला विश्रांती ; हरभजनला डच्चू

September 29, 2011 9:57 AM0 commentsViews: 2

29 सप्टेंबर

इंग्लंडविरुध्द पुढच्या महिन्यात होणार्‍या वन डे सीरिजसाठी भारतीय टीमची आज निवड करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये भारत-इंग्लंडदरम्यान पाच वन डे मॅचची सीरिज भारतात खेळवली जाणार आहे. यातल्या पहिल्या दोन वन डे मॅचसाठी आज के श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली खेळाडूंची घोषणा करण्यात आली. दुखापतग्रस्त सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागला विश्रांती देण्यात आली. इंग्लंड दौर्‍यात ओपनिंगला दमदार कामगिरी करणार्‍या अजिंक्य रहाणेला टीममध्ये जागा मिळाली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे प्रमुख स्पीन बॉलर हरभजन सिंगला डच्चू देण्यात आला आहेत. याचबरोबर उमेश यादव, विनय कुमार यांनाही संधी देण्यात आली आहेत. कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोणी कायम आहे.

close