मल्ल्या किंगफिशर एअरलाईन्सचा 25 टक्के हिस्सा विकणार

November 17, 2008 10:03 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबरकिंगफिशर एअरलाईन्सचा पंचवीस टक्के हिस्सा आंतरराष्ट्रीय एअरलाईन्सला विकण्याबाबत विजय मल्ल्या यांनी पावलं उचलली आहेत. यासंदर्भात किंगफिशर ब्रिटीश एअरवेज, सिंगापूर एअरलाईन्स आणि व्हर्जिन एअरलाईन्सशी चर्चेत असल्याचं सूत्रांकडून समजलंय. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा किंगफिशरनं केलेली नाही. खासगी एअरलाईन्सना देशातल्या एअरलाईन्स उद्योगामध्ये पंचवीस टक्क्यांपेक्षा कमी गुंतवणूक करण्यासाठी झुकतं माप देण्याचा विचार सरकार करतंय आणि किंगफिशरच्या विजय मल्ल्यांनी दूरदृष्टी दाखवत या संधीचा फायदा घेण्याचं ठरवलंय. विजय मल्ल्या यांनी सरकारकडे आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स संबंधीच्या या पॉलिसीवर लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती केली आहे.

close