वर्षाच्या अखेरीस 60 टक्के भारतीय ‘दिल के कमजोर’!

September 29, 2011 4:14 PM0 commentsViews: 6

29 सप्टेंबर

आज वर्ल्ड हार्ट डे… वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यासाठी दरवर्षी खास कार्यक्रम आखते. आपल्या शरीराचा अविभाज्य, अतीमहत्त्वाच्या आणि जन्माला आल्यापासून 24 सात काम करणार्‍या ह्रदयायाची काळजी घेण्याची गरज आहे. येत्या 2011 पर्यंत हृदय विकाराच्या एकुण पेशंटपैकी 60 %पेशंट हे भारतीय असतील. ही भविष्यवाणी आहे जागतिक आरोग्य संघटनेची. याच कारण म्हणजे बदलती जीवनशैली आणि ऑफिसमधील ताणतणावं. या विषयी एम्स आणि पब्लिक हेल्थ फाऊंडेशन मिळून देशातील 10 बड्या कंपन्यातील 3 हजार कर्मचा-यांच्या आरोग्याचा अभ्यास केला.त्यानुसार 28 टक्के हायपर टेन्शनचे पेशंट दिसून आले. तर हाय बीपीचे 60 टक्के पेशंट असल्याचे सर्व्हेक्षणात दिसलं. 10 टक्के ऑफिसर्सना डायबीटीज होता. तर 52 टक्के पुरूष आणि 54 टक्के महिलांमध्ये लठ्ठपणा दिसून आला.40 वर्षाखालील 98 टक्के लोकांना हृदयाचे विविध आजार असल्याचे या सर्व्हेक्षणात दिसून आलं.मात्र हा हृदयविकार तुम्ही टाळू शकता.त्यासाठी गरज आहे, स्मोकिंग टाळण्याची. आहारात हिरव्या भाज्या आणि फळ खावीत. तेलकट आणि गोड खाण टाळावं. आणि त्याच वेळी नियमीत व्यायम करायला मात्र विसरू नका.

हेल्थ सर्व्हे

हायपर टेन्शनचे पेशंट – 28 % हाय बीपीचे पेशंट – 60% डायबेटीज पेशंट – 10% लठ्ठपणा – महिलांमध्ये 54% तर पुरुष 52 % 40 वर्षांखालील लोकांना हृदयाच्या विविध आजारांचं प्रमाण 98%

close