टू जी प्रकरणी अनिल अंबानीही अडचणीत

September 29, 2011 5:48 PM0 commentsViews: 18

29 सप्टेंबर2 जी प्रकरणी आता अनिल धिरुभाई अंबानी ग्रुपचे अध्यक्ष अनिल अंबानी अडचणीत आले आहेत. अनिल अंबानी यांच्या सहभागाची चौकशी करत असल्याचं सीबीआयनं आज सुप्रीम कोर्टात सांगितलं. स्वान टेलिकॉममधल्या रिलायन्स कम्युनिकेशनच्या शेअर्सची डेल्फीला विक्री करण्यात आली होती. त्याप्रकरणी ही चौकशी सुरू आहे. किंमत कमी करून शेअर्सची ही विक्री करण्यात आली होती. याप्रकरणी अटकेत असलेले रिलायन्सचे अधिकारी गौतम दोषी, हरी नायर आणि सुरेंद्र पिपाडा हे साक्षीदार बनू शकतात असं सीबीआयनं सुप्रीम कोर्टात सांगितलं. सीबीआयने टाटा कम्युनिकेशन्स आणि व्हिडिओकॉन इंडस्ट्रीजच्या डेटाकॉमला मात्र क्लीन चिट दिली. 2 जी स्पेक्ट्रम वाटपात टाटांना फायदा झाला नाही. तसंच डेटाकॉम ही कंपनी लायसन्ससाठी पात्र होती, असं सीबीआयनं सुप्रीम कोर्टात सांगितलं.

close