अडवाणींची जनचेतना यात्रा पंतप्रधान पदासाठी नाही -गडकरी

September 29, 2011 5:57 PM0 commentsViews: 3

29 सप्टेंबर

अडवाणींची रथयात्रा ही पंतप्रधानपदासाठी नाही असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलंय. तसेच अडवाणी यांच्या यात्रेला भाजपचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. पाटणाच्या सिताब दियारा या जयप्रकाश नारायणांच्या गावातून या यात्रेला सुरूवात होणार आहे. पाटण्यात होणार्‍या मोठ्या सभेला सुषमा स्वराज, अरूण जेटली, शरद यादव सहभागी होतील.अडवाणींच्या या यात्रेला जनचेतना यात्रा असं नाव देण्यात आलंय. भ्रष्टाचाराचा विरोध, सुशासन आणि स्वच्छ राजकारणाबद्दल जनजागृती करण्यासाठी ही यात्रा असल्याचे गडकरी यांनी सांगितलं. यात्रा 11 ऑक्टोबरला सुरू होईल. आणि 20 नोव्हेंबरला दिल्लीत एका मोठ्या रॅलीनं यात्रेचा समारोप होईल. या दरम्यान 18 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशातून ही यात्रा जाईल.

पंतप्रधान पदावरुन भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच मोदी उद्यापासून सुरू होणार्‍या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीलाही जाणार नाहीत, अशी माहिती मिळतेय.

close