आईनेच घोटला चिमुरडीचा गळा

October 2, 2011 12:14 AM0 commentsViews: 1

02 ऑक्टोबर

नाशिकच्या येवल्यामध्ये एका आईने आपल्या सव्वा महिन्याच्या मुलीचा खून केल्याची घटना घडली. येवला कोपरगाव रस्त्यावरच्या झोपडपट्टीत ही घटना घडली. वैशाली असं या महिलेचं नाव असून ती बाळंतपणासाठी माहेरी आली होती. घरात कुणी नसताना तीनं हे कृत्य केलं आणि चोरट्यांनी हे कृत्य केल्याचा बनाव केला. पोलिसांनी सदरील महिलेला अटक केल्यावर तीनं गुन्ह्याची कबूली दिली. तीला पहिली दीड वर्षाची मुलगी आहे. आताही दुसरी मुलगी झाल्यापासून ती नाराज होती. एका चिमुकलीचाच नव्हे, तर अक्षरश: माणुसकीचा आणि मातृत्त्वाचाच खून होण्याच्या या घटनेनं परिसरातून हळहळ तर व्यक्त होतेय त्याबरोबरच संतापाची भावना आहे. एकीकडे स्त्रीभ्रूण हत्येविरोधात समाजप्रबोधन सुरू आहे, त्यातही दुर्गेचा नवरात्रोत्सव सुरू आहे. असं असतानाच याच काळातही धक्कादायक घटना घडली.

close