मोनोरेलच्या भूमिपूजनाचं मैदान ठरलंय वादग्रस्त

November 17, 2008 4:08 AM0 commentsViews: 4

17 नोव्हेंबर, मुंबईअलका धुपकरमुंबईमध्ये येणार्‍या 2,460 कोटी रुपयांच्या मोनोरेल प्रकल्पाचं भूमीपूजन पंतप्रधान मनमोहन सिंग 29 नोव्हेंबरला करणार आहेत. पण ज्या मैदानावर हा समारंभ केला जाणार आहे ते मैदानच आता वादग्रस्त ठरलंय. 25 हजार रुपये घेऊन मुंबई महानगरपालिकेनं हे मैदान एका संस्थेला दत्तक दिलं होतं. डिपॉझिटचे पैसे घेऊन सहा महिने झाले तरी बीएमसीनं मैदानाचा ताबा संस्थेकडे दिलेला नाही. ' आम्हाला हे मैदान फक्त खेळांसाठी वापरायचं होतं. पण कोणत्याही कार्यक्रमांसाठी हे मैदान वापरलं जातं. रात्री तर इथे दारू पिऊन गोंधळ घातला जातो. पंतप्रधानांच्या दौर्‍यानिमित्त का होईना, पण या मैदानाकडे महापालिका लक्ष देत आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण आता कायमच हे मैदान स्वच्छ रहावं आणि त्याचा गैरवापर केला जाऊ नये, याची महापालिकेनं काळजी घ्यावी असं मत चेंबुर सिटिझन फोरमचे कार्यकर्ते एस बालकृष्णन यांनी व्यक्त केलं. '

close