रिक्षा चालकांकडून प्रवाशांना मारहाण

October 2, 2011 12:47 AM0 commentsViews: 7

02 ऑक्टोबर

दिवसेंदिवस रिक्षा चालकांची दादागिरी वाढत चालली आहे. मुंबईतल्या विक्रोळी भागात रिक्षा ड्रायव्हरने दोन महिला आणि एका पुरुषाला शनिवारी रात्री बेदम मारहाण केल्याचा आरोप गिरीजा उपाध्याय या महिलेनं केला आहे. शनिवारी रात्री ही महिला आपली मुलगी चंद्रीका आणि मुलगा सुभाष सोबत देवीच्या जागरणाच्या कार्यक्रमाला जात होती. त्यावेळी त्यांनी रिक्षावाल्याला विनंती केली पण रिक्षावाल्याने यायला नकार दिला. त्यानंतर उपाध्याय आणि रिक्षा चालकामध्ये बाचाबाची झाली. हा वाद इतक्या विकोपाला गेला की, रिक्षा ड्रायव्हर त्यांना मारहाण केली. रिक्षावाला स्थानिक रहिवाशी असल्यामुळे त्यानं आपल्या आणखी काही रिक्षावाल्यांच्या मदतीनं याना मारहाण करण्यास सुरूवात केली. सुभाष उपाध्य यांच्यावर तलवारीने वार केले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला ताब्यात घेण्यात आलं आहे.

close