बाभळी बंधार्‍यावर छावा संघटनेचा हल्लाबोल ; 3 हजार कार्यकर्ते अटक

October 2, 2011 1:15 AM0 commentsViews: 7

02 ऑक्टोबर

महाराष्ट्र आणि आंध्र सीमेवर असणार्‍या बाभळी बंधार्‍याचा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मागच्या वेळी दोन वेळा चंद्राबाबु नायडू बाबळीचे दरवाजे उघडण्यासाठी महाराष्ट्रात चाल करुन आले होते. पुन्हा हेच दरवाजे करण्यात यावे या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेनं आज बाभळीचे दरवाजे बंद करण्यासाठी हल्लाबोल केला. या आंदोलनासाठी छावा संघटनेचे पाच हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते बाभळी बंधार्‍याजवळ जमले होते. पोलिसांना हा सर्व प्रकार माहिती असल्याने कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आंदोलनाच्या ठिकाणी छावा संघटनेचे संंस्थापक अध्यक्ष अण्णासाहेब जावळे यांनी मोठी सभा घेतली ती सभा सुरु असतांनाच काही कार्यकर्ते पोलिसांची नजर चुकवून बाभळी बंधार्‍यावर पोहचण्याचा प्रयत्न केला. काही कार्यकर्ते पोहून बंधार्‍याजवळ पोहचण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना रोखले. पोलिसांनी तीन हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना अटक करुन धर्माबादच्या आयटीआयमध्ये ठेवले आहे.

close