जम्मू -काश्मीर विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ

October 3, 2011 11:01 AM0 commentsViews: 1

03 सप्टेंबर

जम्मू -काश्मीर विधानसभेत आज अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळाला. चक्क विधानसभा अध्यक्षांनी विरोधीपक्षांच्या आमदारांना शिवीगाळ केली. नॅशनल कॉन्फरन्सच्या एका कार्यकर्त्याच्या, पोलिस कोठडीत मृत्यू झाला. त्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. त्यामुळे चिडलेल्या अध्यक्षांनी शिवीगाळ सुरु केली. या गोंधळानंतर सभागृह तहकूब करण्यात आलं. त्यानंतर विधानसभेचं कामकाज आता पुन्हा सुरू झालं आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष मोहम्मद अकबर लोन यांनी सभागृहाची माफी मागितली आहे.

close