जुन्नरचा बाजार फुलांनी सजला

October 1, 2011 9:41 PM0 commentsViews: 2

02 ऑक्टोबर

नवरात्रामध्ये देवीच्या घटाला घातल्या जाणार्‍या फुलांमध्ये सर्वात जास्त मागणी असते, ती तिळाच्या फुलांना. पिवळयाधम्मक फुलांनी जुन्नर परिसर बहरून गेला आहे आणि या फुलांच्या तोडणी हंगामालाही सुरुवात झाली आहे. सौभाग्याचं लेणं म्हणून हळद आणि कुंकवाला खूप महत्व आहे आणि या रंगांच्या फुलांनाही देवीच्या पूजेत मान असतो. ग्रामीण भागात शेता-शेतामधून खास नवरात्रीसाठी या फुलांची लागवड केली जाते. सध्या ही फुले पिवळ्याधमक ताटव्यांनी बहरली आहेत. एरव्ही बाजारात या फुलांनी म्हणावी तशी मागणी नसते पण नवरात्रात स्त्रिया या फुलांनी खास देवीसाठी हार करुन घेतात. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात कोरडवाहू भागात शेताच्या बाजूने या फुलांचा सध्या बहर आला आहे.

close