रिक्षाचालकांचा संप तूर्तास मागे

October 3, 2011 12:55 PM0 commentsViews: 10

03 ऑक्टोबर

आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी मुंबईत रिक्षाचालकांना आज संप पुकारला होता. आज सकाळी 11 वाजल्यापासून वांद्रेतल्या आरटीओ ऑफिसबाहेर, रिक्षाचालकांचे धरणं आंदोलन सुरु होतं. संध्याकाळी सातच्या दरम्यान हे आंदोलन संपलं. मीटर रिक्षासेवा बंद करून शहरात सगळीकडे शेअर रिक्षा सुरू करावी आणि चालकांना महिन्याला किमान 25 हजार रुपये उत्पन्न मिळेल इतकी रिक्षा भाडेवाढ द्यावी अशी या रिक्षाचालकांची मागणी आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर 9 नोव्हेंबरपासून तीव्र आंदोलनाचा इशारा शरद राव यांनी दिला. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीटर नकोच, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलीय. आजच्या आंदोलनाबाबत शरद राव आणि परिवहन आयुक्त यांच्यात बैठक झालीे. त्यात राव यांनी रिक्षाचालकांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी आयुक्तांनी वरिष्ठांशी चर्चा करण्याचं आश्वासन दिलं.

close