‘रा-वन’ मध्ये दिसणार रजनीकांत !

October 3, 2011 4:23 PM0 commentsViews: 3

03 ऑक्टोबर

शाहरूख खानचा बहुचर्चित 'रा वन' सिनेमात आता आणखी एक चेहरा सगळ्यांच्या उत्सुकतेचा विषय बनला आहे. आणि तो म्हणजे मॅजिकल हिरोे रजनीकांत. दोन सुपरहिरो आता आमने सामने येणार आहेत. पत्रकार परिषदेत शाहरूखने रजनीकांतच्या सिनेमातल्या दृश्यांबद्दल सांगितलं. बॉलिवूड ऍक्टर-प्रोड्युसर शाहरूख खान त्याचा आगामी सिनेमा रा-वनच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. नुकतचं मुंबईत रा-वन या सिनेमावर आधारीत गेम लाँच करण्यात आला. यावेळी किंग खानने रजनीकांतच्या रा वनमधल्या एंट्रीबद्दल सांगितलं.

close