सिंगापूर ओपन गोल्फ स्पर्धा जीव मिल्खा सिंगनं जिंकली

November 17, 2008 10:48 AM0 commentsViews: 7

17 नोव्हेंबर, सिंगापूरभारताचा गोल्फपटू जीव मिल्खा सिंगने सिंगापुर ओपन गोल्फ स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. सेंटोसा गोल्फ क्लबवर झालेल्या या स्पर्धेत 4थ्या राऊंडमध्ये 69 पॉईंट्स मिळवत त्याने स्पर्धा जिंकली. तिसर्‍या राऊंडनंतर जीव मिल्खा सिंगने हॅरिंगटनबरोबर आघाडी मिळवली. चौथ्या राऊंडमध्ये मात्र जीव मिल्खाने अप्रतिम कामगिरी करत हॅरिंगटनला मागे टाकलं आणि विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. या विजयामुळे जीव मिल्खा सिंगने 7 लाख 92 हजार 500 युएस डॉलर्स म्हणजेच 3 कोटी 80 लाख रुपये आपल्या खिशात टाकलेत. याआधी याच वर्षात जीव मिल्खा सिंगने 2 गोल्फ स्पर्धेचं विजेतेपद जिंकलं होतं.

close