रिक्षा चालकांना हवे, महिना 25 हजार !

October 3, 2011 8:38 AM0 commentsViews: 3

03 ऑक्टोबर

मीटर रिक्षासेवा बंद करून शहरात सगळीकडे शेअर रिक्षा सुरू करावी आणि चालकांना महिन्याला किमान 25 हजार रुपये उत्पन्न मिळेल इतकी रिक्षा भाडेवाढ द्यावी या मागणीसाठी रिक्षा चालकांनी मुंबईत आज आंदोलन पुकारले आहेत. कामगार नेते शरद राव यांच्या 'मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियन'च्या झेंड्याखाली आज रिक्षाचालक हे आंदोलन करत आहे. सकाळी 11 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरूवात झाली. 5 वाजेपर्यंत वांद्रेतल्या आरटीओ ऑफिसबाहेर, रिक्षाचालक धरणं देत आहेत. जवळपास 5 हजार रिक्षाचालक या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. रिक्षाचालकांच्या या आंदोलनामुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत. गेल्या महिन्यात आरटीओने फास्ट मीटर करुन प्रवाशांना लुटणार्‍या रिक्षाचालकांवर कारवाई केली होती. त्यानंतरही रिक्षाचालकांनी अघोषित बंद पुकारून प्रवाशांना वेठीस धरलं होतं. आता पुन्हा रिक्षाचालकांच्या या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसतोय.

close