…तर काँग्रेसला मतदान करू नका – अण्णा हजारे

October 4, 2011 9:37 AM0 commentsViews: 2

04 ऑक्टोबर

सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास केलं नाही तर जिथे जिथे निवडणुका आहेत त्या ठिकाणी मी स्वत: जाऊन जनतेला काँग्रेसला मतदान करू नका असं आवाहन करणार आहे असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. सरकारने आश्वासन पाळलं नाही, तर आगामी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मतदानाआधी 4 दिवस मी उपोषण करेन असंही त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात मतदानाआधी तीन दिवस उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा जनलोकपालाला विरोध आहे. त्यामुळे आपण हे आवाहन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. मतदान करताना स्वच्छ चारित्र्याला महत्त्व द्या, असं आवाहनही करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अण्णा निवडणुकीआधी पाच राज्यांचा दौरा करणार आहेत.

अण्णांचं पुढचं पाऊल

-हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल विधेयक पास झालंच पाहिजे- देशभर दौरा करणार – निवडणुका असलेल्या पाच राज्यांचा दौरा करणार-हरियाणापासून दौर्‍याला सुरुवात करणार-उत्तर प्रदेशमध्ये मतदानाच्या 3 दिवसअगोदर उपोषण करणार

close