कन्नड भाषा सक्ती विरोधात एकीकरण समितीचे आंदोलन

October 3, 2011 9:53 AM0 commentsViews: 60

03 ऑक्टोबर

बेळगाव जिल्ह्यामध्ये राहात असलेल्या मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून कन्नड भाषेची सक्ती केली जात आहे. त्याच्या निषेधात बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन पुकारले आहेत. इथल्या सरकारी कार्यालयातील कागदपत्रं मराठी भाषेत देण्याची गरज असतांना त्यांना कन्नड भाषेत उपलब्ध करुन दिली जात आहेत. मराठी भाषिकांची गेल्या अनेक वर्षांपासून पिळवणूक होत आहे. त्यामुळे आज समितीच्या वतीने बेळगाव-गोवा महामार्ग रास्ता रोको करण्यात आलं. आंदोलनात मोठ्या संख्येंने मराठी भाषिक सहभागी झाले आहेत. एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांना अटक झालेली आहे. समितीच्या प्रमुख नेत्यांनाही अटक झाली. पण एकीकरण समितीचे आंदोलन अजूनही सुरूच आहे. बेळगाव जवळ देसूर क्रॉस इथंही आंदोलन सुरू आहे.

close