राष्ट्रवादी नगरसेवक शितोळेंवर खुनाचा गुन्हा दाखल

October 4, 2011 10:00 AM0 commentsViews: 6

04 ऑक्टोबर

पुण्यात पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री जुन्या सांगवीत देवीच्या मिरवणुकीत झालेल्या हाणामारीत, तुषार ढोरे या तरूणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी प्रशांत शितोळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. प्रशांत शितोळे यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्षही होते. जोपर्यंत प्रशांत शितोळे यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका ढोरे यांच्या नातेवाईकांनी घेतली होती. पण शितोळेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर नातेवाईकांनी तुषारचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.

काल रात्री जुन्या सांगवीत शितोळे नगरमध्ये देवीच्या तोरणाची मिरवणूक निघाली होती.या मिरवणुकी दरम्यान 2 गटात झालेल्या हाणामारीत तुषार ढोरे यांचा मृत्यू झाला. या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचा खून केल्याप्रकरणी पिंपरी चिंचवड पालिकेतील राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत शितोळे यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

close