टोल वसुलीसाठी नवी पॉलिसी आणा – अण्णा हजारे

October 4, 2011 10:20 AM0 commentsViews: 42

04 ऑक्टोबर

राज्यात अनावश्यक टोल वसुली होत आहे त्यामुळे राज्यात नवी टोल वसुली पॉलिसी आणा असं आवाहन अण्णा हजारेंनी केलं. जर महिन्याभरात राज्यात टोल वसुलीसाठी नवी पॉलिसी आली नाही तर आपण आंदोलन करू असा इशाराही अण्णांनी दिला. टोलनाक्यांवर इलेक्ट्रॉनिक मशिन्स बसवा असं पीडब्ल्यूडीच्या अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेत अण्णांनी म्हटलं आहे. जर टोलवसुलीसाठी इलेक्ट्रानिक मशिन बसवलं तर राज्यातील 25 ते 30 टोल नाके कायमस्वरूपी बंद होईल असंही अण्णा म्हणाले.

दिल्लीत झालेल्या उपोषणानंतर अण्णांनी राळेगणसिध्दीतून काँग्रेसविरोधात रणशिंग फुंकले. आज सकाळी अण्णांनी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत अण्णांनी काँग्रेसवर तोफ डागली. सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास केलं नाही तर जिथे जिथे निवडणुका आहेत त्या ठिकाणी मी स्वत: जाऊन जनतेला काँग्रेसला मतदान करू नका असं आवाहन करणार आहे असा इशारा अण्णा हजारे यांनी दिला. सरकारने आश्वासन पाळलं नाही, तर आगामी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मतदानाआधी 4 दिवस मी उपोषण करेन असंही त्यांनी सांगितलं. उत्तर प्रदेशात मतदानाआधी तीन दिवस उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा जनलोकपालाला विरोध आहे. त्यामुळे आपण हे आवाहन करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं. मतदान करताना स्वच्छ चारित्र्याला महत्त्व द्या, असं आवाहनही करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अण्णा निवडणुकीआधी पाच राज्यांचा दौरा करणार आहेत.

close