लाहोर बादशहा आयसीएलचे नवे विजेते

November 17, 2008 10:52 AM0 commentsViews: 6

17 नोव्हेंबरलाहोर बादशहा टीमने अखेर इंडियन क्रिकेट लीग म्हणजेच आयसीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आणि स्पर्धेवर आपली बादशाही सिद्ध केली. तिसर्‍या फायनलमध्ये त्यांनी गेल्या वर्षीच्या विजेता टीम हैदराबाद हिरोजचा पराभव केला. विजयासाठी हैदराबाद हिरोजने लाहोर बादशहापुढे विजयासाठी 159 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. शनिवारी झालेल्या दुसर्‍या फायनलमध्ये एवढाच स्कोअर हैदराबादने केला होता आणि लाहोर टीमला पराभव पत्करावा लागला होता. पण यावेळी चित्र वेगळं दिसलं. पाकिस्तानचा माजी ओपनर इम्रान नाझीरने हैदराबादच्या बॉलर्सचा धुव्वा उडवला. त्याने तडाखेबाज बॅटींग करत 44 बॉल्समध्ये नाबाद 111 रन्स केले. त्यात 7 फोर्स आणि 11 सिक्सेस होते. लाहोर बादशहाने 8 विकेट आणि 37 बॉल राखत विजय मिळवला.

close