महालक्ष्मीला मानाचा शालू अर्पण

October 4, 2011 8:09 AM0 commentsViews: 4

04 ऑक्टोबर

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज नवरात्रौत्सवाच्या आठव्या दिवशी महालक्ष्मीला तिरूपतीदेवस्थान कडून मानाचा शालू अर्पण करण्यात आला. करवीर निवासिनी महालक्ष्मी ही तिरूपतीची पत्नी. तिरूपतीच्या दर्शनानंतर महालक्ष्मीचे दर्शन केल्याशिवाय भक्तांची मनोकामना पूर्ण होत नाही अशी आख्यायिका आहे. नवरात्रौत्सव काळात तिरूपतीहून महालक्ष्मीला मानाचा शालू अर्पण करण्याची प्रथा आहे, या प्रथेप्रमाणे आज तिरूपती देवस्थान समितीच्या प्रतिनिधींनी हा शालू महालक्ष्मीच्या चरणी अर्पण केला आहे.

close