पट-पडताळणी भीतीने विद्यार्थी पळवापळवीची चितपट !

October 4, 2011 4:22 PM0 commentsViews: 4

गोविंद तुपे, मुंबई

04 ऑक्टोबर

राज्य सरकारने संस्थाचालकांनी सरकारी अनुदान लाटण्यासाठी विद्यार्थ्याची फुगवून सांगितलेली आकडेवारी खोटी असल्याचं पट-पडताळणी मोहिमेत समोर येऊ लागली आहे. अजूनही विद्यार्थ्यांची पळवापळवी सुरूच आहे. पण पट-पडताळणीसाठी गेलेल्या सरकारच्या काही अधिकार्‍यांची पटपडताळणी मोहिमही आता संशयास्पद असल्याचं दिसतंय.

मुंबईतल्या भांडूप भागात असणारी अभिनव हिंदी प्राथमिक शाळा. एकूण चार वर्ग असणार्‍या या शाळेत पटावर असणारी विद्यार्थी संख्या आहे 170. पण पटपडताळणीच्या वेळी उपस्थित विद्यार्थी होते फक्त 120. आम्ही जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी ती मुलं स्वतबद्दलची भलतीच माहिती देत होती. पण पितळ उघडं पडू नये म्हणून शिक्षकांनी मग अशी बाजू सावरली.

मग आम्ही लगेचंच शाळेबाहेर उभ्या असणार्‍या मुलांना गाठलं. तर त्यांना त्यांच्या शाळेचं आणि स्वतच्याही नावाचा विसर पडला होता. या विद्यार्थ्यांची अशी अवस्था असतानाही पट-पडताळणीसाठी आलेले अधिकारी मात्र शाळेची बाजू सावरत ऑल इज वेल असल्याचं सांगत होते. अधिकार्‍यांना जर हे विद्यार्थी सगळी माहिती देत होते. तर मग आमच्या प्रतिनिधींना मुलं शाळेचं आणि स्वतचं नाव विसरलीच कशी हा प्रश्न पडतो.

ज्यांच्या विश्वासावर ही मोहीम सुरु आहे ते अधिकारीही काही ठिकाणी संस्थाचालकांना सामील झालेत की काय असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे खरीखुरी पटसंख्या कधी आणि किती प्रमाणात पुढे येईल हा एक प्रश्नच आहे.

close