सावकाराने केला रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

October 4, 2011 4:35 PM0 commentsViews: 3

04 ऑक्टोबर

डोंबिवलीत सागाव येथे पैसे देत नाही म्हणून सावकाराने रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मोहन पाटील असं या सावकाराचे नाव आहे. मोहन पाटील यांना रिक्षाचालक कुमारचंद बिंब याला व्याजाने पैसे दिले होते. मात्र दिलेल्या पैशांच व्याजही देत नाही आणि पैसेही परतही करत नाही म्हणून पाटील यांनी रिक्षा चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात तो रिक्षावाला 25 टक्के भाजला असून त्याला डोंबिवलीतील हॉस्पिटल दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी मोहन पाटील याला अटक केली असून त्याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, धमकी देणे या सारखे गुन्हे दाखल करण्यात आले.

close