भ्रष्टाचाराविरोधात कारवाईचे मायावतींचे संकेत

October 5, 2011 12:37 PM0 commentsViews: 2

05 ऑक्टोबर

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी भ्रष्टाचाराविरोधात कडक पाऊल उचललं आहे. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असणार्‍या दोन मंत्र्यांना त्यांनी मंत्रिमंडळातून काढून टाकलंय. राज्याचे शिक्षण मंत्री रंगनाथ मिश्रा आणि कामगार मंत्री बादशाह सिंग या दोन मंत्र्यांवर लोकायुक्तांनी आपल्या अहवालात ठपका ठेवला होता. आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली होती. हे दोन्ही मंत्री कोर्टात निर्दोष असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात घेतलं जाणार नाही असं उत्तर प्रदेश सरकारनं स्पष्ट केलंय. भ्रष्टाचार आणि खुनाच्या आरोपावरून यावर्षी बहुजन समाज पक्षाच्या सरकारला 5 मंत्र्यांना पदावरून काढावं लागलं आहे.

close