आयफोन-4S अखेर लाँच

October 5, 2011 12:48 PM0 commentsViews: 2

05 ऑक्टोबर

तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी क्रांती घडवणार्‍या अ ॅपलचा नवा आयफोन-5 4S अखेर लँाच झाला आहेत. या फोनबाबत लोकामध्ये प्रचंड उत्सुकता होती. आयफोन पाचमध्ये कोणत्या सुविधा असणार, दरवेळाप्रमाणे अ ॅपल काय वेगळे देणार अशी चर्चा ऍपलच्या चाहत्यांमध्ये होती. गेल्या वर्षभरात ऍपलने एकही आयफोन बाजारात आणलेला नाही. काल मध्यरात्री हा फोन लॉच झाला. गुरुवारपासून ऑनलाईन बुकिंग सुरु होईल तर प्रत्यक्षात बाजारपेठेत उपलब्ध होण्यासाठी 14 ऑक्टोंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आयफोन -5 चे प्रमुख वैशिष्टे हा फोन GSM आणि CDMA या दोन्ही तंत्रावर आधारीत आहे. प्रोसेसर जलद गतीने काम करणार आहे. आवाजाचा दर्जाही उत्तम 16,32 किंवा 64 जीबी स्टोरेज ऑप्शन असणारी तीन मॉडेल वॉईस रेकग्निशन सुविधा, हाय रिझोल्यूशन कॅमेरा, किंमत- 16 जीबी- 200 डॉलर तर 64 जीबी- 400 डॉलर असणार आहे.