पाकचा वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय

November 17, 2008 10:56 AM0 commentsViews: 5

17 नोव्हेंबर, अबुधाबीपाकिस्तान आणि वेस्ट इंडिज दरम्यान आबूधाबी इथं सुरु असलेल्या वन डे सिरीजमध्ये पाकिस्तानने तीन – शून्य अशी बाजी मारली. रविवारी झालेली तिसरी आणि शेवटची वन डे पाकिस्तानने 31 रन्सनी जिंकली. ओपनर युनिस खान पाकच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने तडाखेबाज 101 रन्स केले. मिसबाह – उल – हक बरोबर त्याने 79 रन्सची पार्टनरशिप केली. पन्नास ओव्हर्समध्ये पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 273 रन्सचं आव्हान ठेवलं. विंडिजनेही सिरिवात आक्रमक केली. ओपनर ख्रिस गेलने 122 रन्स केले. रामनरेश सारवान बरोबर त्याने तिसर्‍या विकेटसाठी 151 रन्सची पार्टनरशिप केली. पण सारवान आऊट झाल्यावर विंडिजची इनिंग कोसळली. त्यांच्या पुढच्या 8 विकेट्स फक्त 74 रन्समध्ये पडल्या.

close