काँग्रेसला इशारा माझं व्यक्तीगत मत – अण्णा हजारे

October 4, 2011 6:00 PM0 commentsViews: 7

04 ऑक्टोबर

समाजाच्या हितासाठी, राज्य आणि राष्ट्राच्या हितासाठी दबाव का निर्माण करू नये, जनतेची भाषा सरकारला समजत नसेल तर सरकारवर दबाव का आणू नये असा सवाल अण्णा हजारे यांनी उपस्थित केला. 42 वर्षात 8 वेळा विधेयक आलं मात्र ते पास झालं नाही. सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे सरकारला भारत भ्रष्टाचार मुक्त करायचा नाही म्हणूनच काँग्रेस सरकारला मतदान करू नका असं आवाहन जनतेला केलं. तसेच काँग्रेसला दिलेला इशारा हे माझं व्यक्तीगत मत आहे ते जनलोकपाल विधेयकाच्या आंदोलनातून नाही याबद्दल आमची कोअर कमिटीशी कोणतीही बातचीत झाली नाही असा खुलासा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आयबीएन लोकमतच्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात केला.

आज सकाळी राळेगणसिध्दीमध्ये अण्णांनी पत्रकार परिषद घेऊन अण्णांनी काँग्रेस सरकारवर तोफ डागली. सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास केलं नाही तर जिथे जिथे निवडणुका आहेत त्या ठिकाणी मी स्वत: जाऊन जनतेला काँग्रेसला मतदान करू नका हे आवाहन करणार आहे असा इशारा जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला. सरकारने आश्वासन पाळलं नाही, तर आगामी निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये मतदानाआधी 4 दिवस मी उपोषण करेन असंही त्यांनी सांगितलं.

अण्णांच्या या इशार्‍याने काँग्रेसपक्षातून तीव्र नाराजीचा सुर उमटला. अण्णांची टीका ही दुर्देवी आहे त्यांच्या आरोपातून राजकीय पक्षाचा वास येतोय अशा शब्दात काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांच्या टीकांना अण्णांनी प्रतिउत्तर दिले. विरोधकांना टीका करायची असेल तर करू द्या आम्हाला त्याची पर्वा नाही. 42 वर्षात 8 वेळा लोकपाल विधेयक आले मात्र ते मंजूर का करण्यात आले नाही. देशात वाढलेला भ्रष्टाचारामुळे सर्वसामान्य जनता होरपाळून निघाली आहे. जनतेला या भ्रष्टाचार आणि सरकारविरोधात तीव्र संताप आहे. त्यामुळे जनतेला हे सर्व माहित आहे यासाठी काँग्रेसला मतदान करू नका असं आवाहन आम्ही केलं आहे. अ

ण्णांच्या आरोपांमुळे विरोधकांना याचा फायदा होईल अशी चर्चा विरोधकांकडून होतेय असा सवाल अण्णांना विचारला असता अण्णा म्हणाले की, विरोधकांना फायदा होण्याचा आणि न होण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. त्यांना आपण फायदा का मिळवून द्याचा असा सवाल अण्णांना उपस्थित केला. आयबीएन लोकमतच्या 'प्राईम टाईम' या कार्यक्रमात संपादक निखिल वागळे यांच्याशी बातचीत करत असतांना आंदोलनाच्या सदस्या सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी अण्णांनी काँग्रेसला दिलेला इशारा याबद्दल टीम अण्णा कोअर कमिटीशी बातचीत झाली नाही असा खुलासा केला. यानंतर झालेल्या 'आजचा सवाल' या कार्यक्रमात खुद्द अण्णा हजारे यांनी काँग्रेसला दिलेला हा इशारा हे माझं व्यक्तीगत मत आहे. हा इशारा आंदोलनातून नाही आहे असा खुलासा अण्णांनी केला.

close