चक्क शाळेच्या खोल्यांमध्ये वसतीगृहांचा आभास !

October 5, 2011 10:33 AM0 commentsViews: 3

05 ऑक्टोबर

शाळेतील पटसंख्येबरोबर वसतिगृहातील विद्यार्थांची खातरजमा करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. या पथकाचीदेखील दिशाभूल केली जातेय. पंढरपुरातल्या पळशीमध्ये शाळेच्या खोल्यांमध्ये वसतीगृह असल्याचा आभास निर्माण केला गेला. सुखदेव चव्हाण यांच्या या शाळेला मान्यता नाही. पण वसतीगृहाला मात्र मान्यता आहे. या खोल्यांमध्ये विद्यार्थी राहतात असा इथल्या अधिक्षकांचा दावा आहे. पण हे सगळे बनावट विद्यार्थी असल्याचं नागरिकांचे म्हणणं आहे. तर आपल्याविरोधात बोगस विद्यार्थी असल्याचा बनाव केला जातोय असं संस्थाचालकांचं म्हणणं आहे.

close