गोव्यात लोकायुक्त विधेयक मंजूर ; दिगंबर कामत अडचणीत

October 5, 2011 4:30 PM0 commentsViews: 5

05 ऑक्टोबर

गोवा विधानसभेत आज लोकायुक्त विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे विधेयक मंजुरीच्या प्रतीक्षेत होतं. हे विधेयक मंजूर करण्यासाठी गोवा विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सर्वानुमते लोकायुक्तांचे विधेयक मंजूर करण्यात आलं. तर दुसरीकडे गोव्यातल्या बेकादेशीर खाणकाम प्रकरणी मुख्यमंत्री दिगंबर कामत अडचणीत आले आहेत. गोवा विधासभेच्या लोकलेखा समितीने बेकायदेशीर खाणकामाचा अहवाल विधानसभेच्या अध्यक्षांकडे सादर केला. खाणकाम मंत्रालय मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याकडे असल्याने कामत अडचणीत आले आहेत. तब्बल 4 हजार कोटींचा हा घोटाळा आहे, असा अंदाज PAC नं व्यक्त केला. यापासून राज्याचा सुमारे 200 कोटींचा महसूल बुडाला. कर्नाटकातल्या बेल्लारीपेक्षाही गोव्यातला खाणकाम घोटाळा मोठा असल्याचा आरोप PAC चे अध्यक्ष मनोहर पर्रीकर यांनी केला.

close