अण्णांच्या लोकायुक्त मागणीवर भाजप सहमत – मुंडे

October 5, 2011 2:54 PM0 commentsViews: 1

05 ऑक्टोबर

भाजपशासित राज्यांमध्ये लोकायुक्त नेमण्यास आपला पक्ष तयार आहे आणि याकरता अण्णा हजारेंचं जनलोकपाल बिल संसदेत मंजूर व्हावं म्हणजे या बिलातील तरतुदीनुसार सक्षम लोकायुक्त राज्या-राज्यांमध्ये नेमला जाईल आणि भाजपची यावर अण्णांशी सहमत आहे अशी ग्वाही भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुण्यात दिली. तसेच जनलोकपाल बिल मंजूर करावे यासाठी अण्णांनी काँग्रेसविरोधात लोकांनी मतदान करा असं आवाहन करणं हे राजकारण नाही. भाजप या मुद्दयाकडे फायद्याच्या दृष्टीकोनातून पहात नाही तर जनलोकपाल बिलाला भाजपचा संपूर्ण पाठिंबा आहे असा दावाही मुंडे यांनी केला. पुण्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त आयोजित पर्दर्शनाच्या उदघाटनानंतर मुंडे बोलत होते.

close