आता कॉलेजमध्येही होणार पट-पडताळणी !

October 6, 2011 9:09 AM0 commentsViews: 8

06 ऑक्टोबर

शाळांच्या पट-पडताळणीनंतर आता सीनिअर कॉलेजमध्येही पट-पडताळणी होणार आहे. उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमध्ये याबाबतची घोषणा केलीय. लवकरच याबाबतचा प्रस्ताप मंत्रीमंडळाकडे सादर करणार असल्याचं टोपेंनी म्हटलं आहे. युजीसीला सुद्धा या मोहीमेत सोबत घेणार असल्याचे टोपे म्हणाले. राज्य सरकारने 2 ते 5 ऑक्टोबर अशी तीन दिवसांची शाळांची पट पटपडताळणी मोहीम राज्यात राबवली. आणि या मोहीमेनंतर अनेक धक्कादायक गैरप्रकार उघडकीस आले. विद्यार्थ्यांच्या पळवापळवीपासून ते बोगस शाळा थाटण्यापर्यंत असे अनेक प्रकार मोहिमेत उघड झाले.

close