‘अ ॅपल’ सम्राट स्टीव्ह जॉब्स यांचे निधन

October 6, 2011 9:32 AM0 commentsViews: 2

06 ऑक्टोबर

आयपॉड,आयफोन आणि अ ॅपल कॉम्प्युटरने आधुनिकक्षेत्रात क्रांती घडवून आपला ठसा उमटवणारे अ ॅपलचे संस्थापक सदस्य माजी अध्यक्ष स्टीव्ह जॉब्स यांचं काल गुरूवारी पहाटे कॅन्सरनं निधन झालं. ते 56 वर्षांचे होते. काही दिवसांपासून जॉब्स यांना पोटाचा कर्करोगाने आजारी होते. यावर उपचारासाठी जॉब्स यांनी अध्यक्षपदाचा अलीकडेच राजीनामा दिला होता. परवाच त्यांच्या अनुउपस्थीत आयफोन 4s लाँच करण्यात आला. मात्र गुरूवारी पहाटे अ ॅपल सम्राटावर काळाने झडप घातली.

अ ॅपलमध्ये असताना नवनवीन आयडियाचं लाँचिंग करत त्यांनी प्रतिस्पर्धी सॉफ्टवेअर कंपन्यांना जोरदार आव्हान उभं केलं होतं. दरवेळेस स्टीव्ह काय नवीन आणणार याची सामान्यांबरोबरच मीडिया आणि त्यांच्या स्पर्धकांनाही उत्सुकता असायची. अ ॅपलमधून अपमानित होऊन 1985ला बाहेर पडावं लागल्यानंतरही त्यांनी पिक्सर आणि डिस्नेच्या माध्यमातून त्यांच्यातील जबरदस्त क्षमता आणि गुणवत्ता सिद्ध केली. शेवटी अ ॅपलला परत त्यांना सन्मानाने परत बोलवावंच लागलं. अ ॅपलचे पीसी असोत, आयपॉड असोत की आयफोन्स स्टीव्हची गुणवत्तेची मोहोर त्यावर असायची. त्यांच्या आयफोनंने तर मोबाईल युगात क्रांतीच केली. याचदरम्यान स्टीव्हना कॅन्सरनं गाठलं. काळाची पावल ओळखून स्टीव्हन नुकतंच ऑगस्ट 11 मध्ये आपल्या सीईओ पदाचा राजीनामा देऊन टीम कुककडे सगळा कारभार सोपवला होता. कालच अ ॅपलनं आपल्या आय -4 S चं लाँचिंग केलंय. त्याचदिवशी जॉब्स यांचं निधन हा एक दुर्देवी योगायोग म्हणावा लागेल. स्टीव्ह एक वेगळया आणि क्रांतिकारक विचारांचा अमेरिकन संशोधक होता, असं म्हणून अध्यक्ष बराक ओबामांनी त्यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त केलंय.

close