राज्यात विजयादशमीचा उत्साह

October 6, 2011 10:35 AM0 commentsViews: 17

06 ऑक्टोबर

गोंडा अर्थातच झेंडूच्या फुलांच्या राशी..गव्हा-तांदळाच्या ओंब्या…आंब्याच्या पानांच्या डहाळ्या…आणि मनामनात भरुन राहिलेला खूप सारा आनंद..नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्साहाचा कळस म्हणजे दसरा. दुष्ट प्रवृत्तींवर विजय मिळवण्याचं प्रतीक म्हणून आज रावणाच्या पुतळ्याचे दहन होतं. त्याचबरोबर आयुष्याच्या एका नव्या पर्वाची सुरुवात म्हणूनही दसर्‍याकडे पाहिलं जातं. सीमोल्लंघनाचा खरा अर्थच विधायकेतचं नवं पाऊल असाच आहे. त्यामुळेच सगळ्या चांगल्या कामांची आजच सुरुवात केली जाते. पाटी-पुस्तकांची मनोभावे पूजा आणि शस्त्रांचे पूजनही त्याच परंपरेतून आलेलं. त्याबरोहरच साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्‍याला सोनेखरेदीचंही महत्त्व आहे. त्यामुळेच आजचा खास दिवस सगळीकडेच उत्साहात साजरा केला जातोय..

close