सोनं,चांदीच्या विक्रीचा उच्चांक होण्याची शक्यता

October 6, 2011 7:45 AM0 commentsViews:

06 ऑक्टोबर

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजे विजयादशमी. दसर्‍याला मुहूर्ताचं सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. बाजारपेठेत जोरदार घसरण झाल्याने यंदा सोनं,चांदीची जोरदार खरेदी ग्राहक करतील असा अंदाज सराफी व्यापार्‍यांनी व्यक्त केला आहे. आज मुंबईत सोन्याचा भाव 23 कॅरेटला 27 हजार 165रुपये आहे. तर 24 कॅरेटला 27 हजार 845 रुपये आहे. सोन्यातील गंुतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते.आज सोनं विक्रीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. यंदा चांदी खरेदी करण्याकडेही ग्राहकांचा कल दिसून येतोय. गेल्या काही दिवसात सतत होत असलेल्या घसरणीमुळे सोनं 10 ग्रॅमला जवळपास 1 हजार तर चांदीत प्रतिकिलो 2600 रुपयांची घसरण झाली आहे. येत्या कालावधीत मात्र सोनं,चांदीच्या भावात वाढ होणार असल्याचा अंदाज सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

close