संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरले

October 6, 2011 5:30 PM0 commentsViews: 6

06 ऑक्टोबर

सरकारच्या पटपडताळणी मोहीमेत कारवाई होऊ नये म्हणून मान्यता नसलेल्या शाळांच्या संस्थाचालकांनी विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याचं उघड झालं.रत्नागिरीतल्या दयाळ गावातल्या कुणबी शिक्षण संस्थेच्या शाळेतील 8 वी ते 10 वीच्या 71 विद्यार्थ्यांना दिवसभर उपाशी राहून 4 तास जंगलात नेऊन ठेवण्यात आलं. टेंपोतून या विद्यार्थ्यांना याच संस्थेच्या शिरशी शाळेत पट दाखवण्यासाठी नेलं जात होतं. पण खेड तहसिलदारांनी या टेंपोचा पाठलाग केल्यामुळे टेंपो चालकाने या विद्यार्थ्यांना आडरस्त्याने जंगल भागात नेऊन ठेवलं होतं. रात्री या विद्यार्थ्यांना मंदिरात आणण्यात आलं. आणि नंतर प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी पंचनाम्याची कारवाई पूर्ण केली. या सगळ्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले असून संस्था चालकांवर कठोर कारवाईची मागणी या पालकांनी केली आहे.

close