यंत्राची पूजा करून अधिक उत्पादनाचं कामगारांचं साकडं

October 5, 2011 7:53 PM0 commentsViews: 5

06 ऑक्टोबर

पिंपरी-चिंचवडमध्ये एक आगळी-वेगळी पूजा साजरी करतात, ती म्हणजे खांडे नवमी. उद्योग नगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड परिसरात तब्बल चार हजार कंपन्या आहेत. या कंपन्यातील लाखो कामगार नवमीचा मुहूर्त साधून दरवर्षी त्यांच्या मशीन्सची पूजा करत असतात. इथल्या कामगार वर्गासाठी नवमीचा हा दिवस अत्यंत उत्साहाचा असतो. यंत्राची पूजा केल्यानंतर वर्षातला हा एकच दिवस असतो ज्यादिवशी कोणत्याही प्रकारचं उत्पादन केल्या जात नाही. यंत्राची विधीवत पूजा केल्यानंतर अधिक उत्पादन मिळण्याची मागणी हे कामगार करत असतात.

close