कोल्हापुरात सीमोल्लंघनाचा शाही सोहळा थाटात साजरा

October 6, 2011 4:35 PM0 commentsViews: 6

06 ऑक्टोबर

म्हैसूरपाठोपाठ कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकात सीमोल्लंघनाचा शाही सोहळा थाटात साजरा झाला. चौेकात सर्वात आधी श्री महालक्ष्मी आणि भवानी मातेच्या पालख्यांचं आगमन झालं. त्यानंतर कोल्हापूरचे छत्रपती घराणं मेबॅक या विंटेज कारमधून आपल्या पूर्ण लवाजमासह दाखलं झालं. त्यानंतर पोलीस बॅन्डनं छत्रपतींना मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर चौकाच्या मधोमध उभारलेल्या शमी आणि आपट्याच्या पानांचं पूजन होतं. श्रीमंत छत्रपती शाहु महाराज ही पूजा करतात. त्यानंतर होते ती या सोन्याची लूट. हा शाही सोहळा पाहण्यासाठी जमलेले हजारो कोल्हापूरकर सोनं लुटतात. छत्रपती घराण्याचं सदस्य लोकांकडून सोनं स्वीकारतात.

close