तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन

October 6, 2011 8:07 AM0 commentsViews: 65

06 ऑक्टोबर

आजच्या दसर्‍याचा दिवशी तुळजाभवानी देवी सीमोल्लंघन करते अशी आख्यायिका आहे. गेली नऊ दिवस देवी महिषासुराबरोबर युद्ध करत होती. देवीने महिषासुराचा युद्धात पराभव केल्यामुळे आज दसर्‍याच्या दिवशी मंदिरात विजयोत्सव साजरा करण्यात येतो. देवी विजयोत्सव करण्यासाठी मंदिराच्या बाहेर पडते. देवीची भक्तांकडून मिरवणूक काढण्यात येते. म्हणजे सीमोल्लंघन करण्यात येते. देवीच्या मिरवणुकीसाठी मानाची समजली जाणारी पालखी व पलंग देवीच्या माहेरावरुन म्हणजे नगरवरुन आला. देवीच्या मिरवणुकीनंतर पालखीचे हवनात विसर्जन करण्यात येते. यानंतर देवी पुढील पाच दिवस पोर्णिमेपर्यंत निद्रावस्थेत जाते. या पुजेच्यावेळी लाखो भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी हजेरी लागली.

close